Sogras, Chandwad, चांदवड, ढेकूळ, Raosaheb Jadhav

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

'ढेकूळ'

" कवी रावसाहेब जाधव यांच्या 'ढेकूळ’ काव्यसंग्रहास 'पद्मश्री कविवर्य नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा' पुरस्कार"
       सोग्रस माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कवी रावसाहेब जाधव यांच्या शेतीमातीच्या कविता असलेल्या ‘ढेकूळ’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगर तर्फे पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा प्रथम पुरस्कार पद्मश्री कविवर्य ढसाळ यांच्या कनेरसर या जन्मगावी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष मा.सतीश गोरडे, अध्यक्ष मा. संतोष गाढवे, प्राचार्य पांडुरंग गाडीलकर, उपाध्यक्ष मा. सदाशिव आमराळे, सौ.नंदा भोर, मधुकर गिलबिले या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
      या यशाबद्दल कवी जाधव यांचे कवी रविंद्र केदा देवरे, मनोज बर्वे, मनोज गुजराथी, कवी सागर जाधव जोपुळकर, कवी प्रकाश होळकर, साहित्यरसिक शिरिषकुमार कोतवाल, कवी संदीप देशपांडे, प्रकाशक मा.बाळासाहेब घोंगडे, कवी सागर काकडे, डॉ. राजेंद्र मलोसे, डॉ. श्याम जाधव, मा. दत्ता कदम, श्री. ह. शै. सा. संस्थेचे सचिव मा. भास्करराव बनकर, अध्यक्ष मा.शंकरराव गांगुर्डे, अशोकराव महाराज, उपसरपंच मा.सुभाष पुरकर, मुख्याध्यापक अशोक बोरगुडे, रामनाथ बोरसे, शिक्षक भगवंत बोरगुडे, सुभाष गांगुर्डे, कडू थोरमिसे, बाळकृष्ण जाधव, सूर्यभान भांबर, भागवत मांदळे, दीपक भदाणे, कवयित्री सुशीला सकलेचा, रुपाली खैरनार, सविता दिवटे, सविता दरेकर, कादंबरीकार संजय गोराडे, चित्रकार देविदास हिरे, कवी बाळा पाडवी, संदीप गुजराथी, पी.एस.आय.सुनील भदाणे,माणिक गांगुर्डे, कौतिक शिंदे, विजय देवरे, आदींनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा